लागणारं साहित्य:
१ किलो बटाटा
१ किलो भगर
१ किलो साबुदाणा
मीठ
तिखट व
जिर्याची पूड
कृती:
साबूदाणा आदल्या दिवशी भिजवून ठेवणे. आदल्याच दिवशी बटाटे उकडून घेणे. दुसर्यादिवशी भगर शिजवून घेणे. त्यात साबूदाणा व उकडलेल्या बटाट्याचा लगदा करून मिसळावा. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट पावडर जिर्याची पुड टाकून एकत्र करून घ्यावे. व चकली पात्रानी चकली करावी. चकल्या कडक उन्हात कडकडीत वाळवाव्यात. या चकल्या तळून आंब्याच्या रसासोबत छान लागतात. तसंच उपवासाला चालतात.
Tuesday, 1 May 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment