Sunday, 20 January 2008

चकली

साहित्य:

दाळीचं पीठ १ वाटी
ज्वारीचं पीठ ३ वाट्या
तेल मोहन व तळण्यासाठी
हळद चवी पुरती
तिखट चवी पुरतं
मीठ चवी पुरतं
हिंग चवी पुरता
ओवा चवी पुरता
जिरे चवी पुरते

कृती:
दाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, हळद, तिखट, मीठ, जिरे, ओवा, हिंग हे सर्व एका कोरड्या भांड्यात मिक्स करून घ्यावे. तेल कडकडीत तापवून त्याचं मोहन वरील मिश्रणात मिश्रण ओलसर होईल इतकं टाकून एकत्र करावं. साध्या पाण्यात भिजवावं. चकली पात्राला आतून तेल लावून वरील मिश्रण त्यात भरावे. कागदावर हळू हळू दाबत चकली पाडावी. गॅसच्या मध्यम आचेवर चकली तळून घ्यावी.

No comments: