दाळीचं पीठ (बेसन) - ४ वाट्या
हिंग - अंदाजे पाऊण चमचा
ओव्याची पुड - १ चमचा
लाल तिखट व मीठ - चवी प्रमाणे
तेल - मोहन व तळण्यासाठी
चार वाट्या दाळीचं पीठ घेऊन त्यात हिंग तिखट व मीठ घालून कोरडंच एकत्र करावं. कढईत तेल कडकडीत तापवून साधारण पाव ते अर्धी वाटी तेल दाळीच्या पीठात घालून ओलसर करून घ्यावं. नंतर पाणी घालून हे मिश्रण साधारण सैल भिजवून घ्यावे.
शेवेच्या सोर्यात (शेव पात्रात) घालून शेव तेलात पाडावी. शेवेचा रंग बदलत आला की तिला झारीने तेलात दाबावे. उलटू नये. तळून झाली की रोळी मध्ये काढून घ्यावी. तेल निथळून जाऊ द्यावे.
स्त्रोत: आई
Friday, 22 June 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment